PMEGP-पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम-अर्ज करण्यासाठी सविस्तर वाचा1

Nayi Khabare
2 Min Read
1 scaled

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)

15 ऑगस्ट 2008 रोजी, भारतीय स्वातंत्र्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त, मा. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकारतर्फे उद्योजकांना सक्षम बनविण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ही योजना सुरू केली. या योजनेत, जिल्हा उद्योग केंद्राकडे कार्यान्वित पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व खादी व ग्रामोद्योग आयोगाची आर.ई.जी.पी. योजना या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या आहेत.

PMEGP

उद्देश:

  1. ग्रामीण भागातील रोजगार वाढविणे.
  2. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  3. खेड्यांमधून शहरांमध्ये स्थलांतर होणाऱ्या बेरोजगार युवकांचे व पारंपरिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे.

योजने अंतर्गत उद्योगाची व्याख्या:

खादी आयोगाने काही उद्योगना मनाई केलि आहे, त्यांची यादी खाली दिलेली आहे, त्यावितिरिक्त बाकी परवानगी दिलेले उदयोगांची यादी खाली दिलेली आहे.

नकारात्मक उद्योग यादी:

  • मांस प्रक्रिया व कॅनींगशी संबंधित उद्योग
  • पान, बीडी, सिगार, तंबाखू उत्पादन व विक्री
  • मद्य/ताडी विक्री होणारी हॉटेल्स व धाबे
  • शेती उत्पादन, जसे की रेशीम शेती (कोकून पालन), फलोत्पादन, फुलशेती, पशुपालन
  • 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन कॅरी बॅग तयार करणे
  • स्थानिक सरकार/अधिकारी यांनी प्रतिबंधित केलेले उपक्रम

परवानगी दिलेले उद्योग:

  • डेअरी उद्योग: दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ
  • कुक्कुटपालन, मत्स्यपालन, कीटक संबंधित उपक्रम
  • NER राज्यांमध्ये डुक्कर पालन

ग्रामोद्योगाची व्याख्या:

गाव, खेडे व ग्रामीण भाग जिथे लोकसंख्या 20,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे.

लाभार्थीची पात्रता:

  1. 18 वर्षावरील व्यक्ती
  2. उत्पन्न मर्यादा लागू नाही
  3. कमीत कमी 8वी पास (5 लाखाच्या वरील प्रकरणासाठी)
  4. नवीन प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य
  5. स्वंयसहाय्यता बचत गट
  6. 1860 च्या कायद्याने स्थापन संस्था, विश्वस्त संस्था, 1960 अन्वये स्थापन सहकारी संस्था
  7. अर्ज ऑनलाईन PMEGP ई-पोर्टलवर: www.kviconline.gov.in

अर्थसहाय्याचे वर्गिकरण:

  • उत्पादन उद्योगासाठी 50 लाख मर्यादा
  • सेवा उद्योगासाठी 20 लाख कर्ज सहाय्य मर्यादा
  • मार्जिन मनीचा स्तर:
  • सर्वसाधारण गट: शहरी भागात 10%, ग्रामीण भागात 15%
  • विशेष गट: अनुसूचित जाती/जमाती, अल्पसंख्यांक, तृतीयपंथी, इतर मागासवर्गीय, महिला, माजीसैनिक, अपंग, NER व डोंगराळ प्रदेश: शहरी भागात 5%, ग्रामीण भागात 25-35%

या योजनेंतर्गत, ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन, बेरोजगारांचे स्थलांतर थांबविण्याचा उद्देश आहे.

Also Read:https://nayikhabare.com/majhi-ladki-bahinमाझी-लाडकी-बहिन-योजना-क/

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *